सोशल मीडियावर सिल्वेस्टर स्टेलॉनचे निधन झाल्याची वाऱ्या सारखी पसरली या संदर्भातील मेसेजही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या मेसेजवर प्रतिक्रिया देताना सिल्वेस्टरने आपल्या चाहत्यांना याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. या मुर्खपणाकडे दुर्लक्ष करा असे ट्विट स्टेलॉनने केला आहे.मी ठणठणीत आहे असून आनंदी आहे. अजूनही ठोसे लगावत आहे असे सिल्वेस्टरने म्हटले आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या फोटोंमध्ये सिल्वेस्टर आजारी दिसत असून तो वार्धक्याने थकलेला दिसत आहे. तसेच त्याच्या डोक्यावरचे केस गळलेले आहेत. तसेच त्याच्या जन्माचे वर्ष आणि मृत्यूचे वर्ष असलेला फोटोही व्हायरल होत आहे. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews